शरद कोळी यांच्या विरोधात एरंडोल येथे गुन्हा
खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | आमदार चिमणराव पाटील यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये टिका केल्यावरून येथे शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद कोळी यांनी आधी एरंडोल येथील सभेत आमदार चिमणराव पाटील यांच्या विरूध्द देखील खालच्या भाषेत टीका केली होती. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भीमसिंग जाधव, राजेंद्र चौधरी आणि शालीग्राम गायकवाड यांनी एरंडोल पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार शरद कोळी यांच्या विरूध्द भादंवि कलम-५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात, शरद कोळी यांच्यावर जळगाव जिल्ह्यात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम