भुसावळ शहरातील आंबेडकर नगर मध्ये चालता ट्रक घरात घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी
खान्देश लाईव्ह । ९ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील तापी नदी जवळ असलेल्या आंबेडकर नगरातील एका घरात चालता ट्रक घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . या घटनेमुळे आंबेडकर नगरात मोठी शोककळा पसरली आहे . कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भुसावळहुन यावल कडे जाणाऱ्या मद्यधुंद ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक आंबेडकर नगरातील एका घराला जोरदार धडकला त्यात सम्राट दादाराव इंगळे वय 21 वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा दुसरा भाऊ या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
या घटनेमुळे आंबेडकर नगरावर मोठी शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड ट्राफिक वाहतूक शाखेचे स्वप्नील नाईक घटनास्थळी दाखल झाले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम