लिंगभेदभाव नष्ट झाला पाहिजे : डॉ. प्रीती अग्रवाल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ९ एप्रिल २०२२ । आज महिलांच्या बाबत ‘चूल व मूल’ हि संकल्पना गळून पडली असून त्या आता कंबर कसून संघर्ष करीत आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिला सक्षमीकरणासाठी घरात-समाजात भेदभाव टाळून सर्वत्र लिंगभावसमानता आली पाहिजे. स्त्रियांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. विविध क्षेत्रात महिलांनी आपले स्थान मजबूत केलेले आहे, असे प्रतिपादन रायसोनी शैक्षणिक संस्थेच्या संचालिका तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रीती अग्रवाल यांनी केले.

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेच्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातर्फे “महिला सक्षमीकरण :शाश्वत विकासाची गुरुकिल्ली” हा विषय घेऊन शनिवारी ९ एप्रिल रोजी सहावी एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी परिषदेचे उदघाटक म्हणून डॉ.अग्रवाल बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी हे होते. प्रमुख पाहुणे केंद्राच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या प्रादेशिक संचालिका सारिका डफरे, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, संचालक प्रा. डॉ. विनय पाटील, प्रा.डॉ. जयश्री महाजन, प्राचार्य डॉ.जयश्री नेमाडे, फ्रुट सेल सोसायटी चेअरमन भालचंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like