श्री रामनवमी निमित्त “गीत रामायण”

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ९ एप्रिल २०२२ । चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात. या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गातात, कीर्तन होते.राम हे पुण्याचे प्रतिक आहेत, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपले आदर्श सोडले नाहीत आणि सन्मानाने जीवन व्यतीत केले. म्हणूनच त्यांना  सर्वोत्कृष्ट पुरुषाचे स्थान देण्यात आले आहे.रामराज्य  शांती आणि समृद्धीचे  प्रतीक आहे.

संस्कार भारती जवळपास गेली २५ वर्षे सातत्याने प्रभू रामांचा जन्मोत्सव गीतरामायणातून साजरा करीत आहे, याद्वारे गीतांतून प्रभू रामाच्या जन्माची संगीतमय कथा सांगितली जाते. सदर कार्यक्रम जळगाव शहराचे ग्राम दैवत श्रीरामांच्या जुन्या जळगाव येथील स्थित श्री राम  मंदिरात  रविवारी १० एप्रिल, २०२२ रोजी रात्री ८ वाजता                 होणार आहे. सर्व श्रीराम भक्तांनी गीतरामायणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार  भारती जळगाव चे अध्यक्ष प्राचार्य सुभाष महाले यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like