यावल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I शहरातील संभाजी पेठ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भरत शंकरराव इंगळे (वय ५० वर्ष धंदा-मिस्त्री काम) यांनी दि. ८ रोजी रात्री ३:३० वाजेच्या सुमारास नक्की वेळ माहीत नाही यांनी आपल्या संभाजी पेठ परिसरातील राहत्या घराच्या छता असलेल्या लोखंडी पाईपास दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. भरत इंगळे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. यावल पोलीस ठाण्यात मयताचा पुतण्या राजेन्द्र इंगळे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन मयत भरत इंगळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like