वरणगाव येथे रीक्षा चालकावर धारदार हत्याराने हल्ला
खान्देश लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ Iतालुक्यातील वरणगाव येथे रीक्षा चालकावर धारदार शस्त्र मारून हल्ला करण्यात आल्याची घटना स्टेशन रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरणगाव शहरातील रहिवासी विजय अशोक मगरे (30, वामन नगर, वरणगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत संजय रमेश इंगळे (शिवाजी नगर, वरणगाव) यांना गल्लीत येवू नका, असे म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील मिलिंद मेढे यांच्या कार्यालयासमोर धारदार शस्त्राने छातीवर दोन वेळा वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मगरे हे जखमी झाले असून संशयीतांविरोधात भादंवि 307 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम