आता तर अजून चार पेनड्राईव हळू हळू बाहेर येणार; दानवेंचा भारी खुलासा…

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | सध्या राज्यात ईडी च्या छाप्यामुळे असूद्यात किंवा राजीनामा द्यावा प्रकरण सुरू असता राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केलं असून सोबत अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार असल्याचा भारी असा गौप्यस्फोट भाजप पक्ष नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

तिकडून एखादा आरोप झाला की आम्ही एका मागोमाग पुढचे आम्ही पुढचे पेन ड्राइव बाहेर काढू असा इशाराही दानवे यांनी सरकारला दिला आहे.बरं जर पेन ड्राईव्ह मध्ये सत्यता नव्हती तर मग ऍड. प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला असा सवालही रावसाहेब दानवे यांनी सर्वांसमोर उपस्थित केला आहे.

पुढे ते असेही म्हणाले की पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे म्हणूनच त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे. आणि त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशीही ठोस मागणी त्यांनी सरकारला केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like