पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल नाही, पहा आजचे दर
खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
भारतीय जनता पक्षाने 4 राज्यांमध्ये सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरानुसार, दिल्लीसह विविध महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वरच आहेत. आज जळगावात पेट्रोल डिझेलचे दर 110.86/ 92.88 आहे. तर दुसरीकडे
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही विरोधकांनीही याच मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे गुरुवारी निकाल जाहीर झाल्यावर आज (शुक्रवारी) पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी वाढतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते.
बीड ११.५९ / ९४.३२
बुलढाणा ११०.८८ / ९२.९६
चंद्रपूर ११०.६५/ ९३.४५
धुळे ११०.४६ / ९२.४९
गडचिरोली १११.२४/ ९३.७६
गोंदिया १११.१८/ ९४.३३
बृहन्मुंबई ११०.१६ / ९४.३२
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम