सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ, जाणून घ्या आजचा दर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | जागतिक बाजारातील नरमाईमुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या किमती घसरल्या. सोन्याचा वायदा भाव 53 हजार रुपयांच्या खाली आला होत्या. जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कोसळल्यानंतर भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घट नोंदली गेली.

रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीचे दर वेगाने वाढले होते. मात्र आता युद्ध मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरानत वाढ घट होत आहे. आज शुक्रवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,४९० रुपये इतका आहे. तर चांदी ७२,१२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घटणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

युद्ध मंदावण्याच्या शक्‍यतेमुळे आणि उत्तर प्रदेशात भाजपा जिंकल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचा परिणाम रुपयाचे मूल्य वधारण्यात झाला. याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.जळगाव सराफ बाजारात या आठवड्यात सोने जवळपास १५०० हजाराहून अधिकने महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात जवळपास २५०० हजार रुपयाची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like