यावल पंचवार्षिक नगरपरिषद निवडणूकिची प्रभाग रचना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | जळगाव शहरातील यावल येथील नगर परिषद निवडणूकिची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. येथील प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडी यांनी नगरपरिषद शहर तलाठी व तहसील कार्यालयासह पालिकेच्या संखेतस्थळावर प्रसिद्ध केली. पहिल्या दिवशी एकही सुचना / हरकती नगरपरिषद प्रशासनात प्राप्त नाही.

आगामी पंचवार्षिक निवडणूकिसाठी प्रारूप रचने नुसार शहरात अकरा प्रभाग करण्यात आले आहे. यावल नगरपालिका गेल्या पंचवार्षिक निवडणूकित नगरसेवकांची संख्या ही २० होती यावेळेस मात्र ३ जागा वाढल्याने एकूण संख्या २३ झाली आहे. नगराध्यक्षाची निवड ही नगासेवकातुन होणार आहे . त्यानुसार एक प्रभागाची वाढ झाली असून येणाऱ्या आगामी निवडणूकिनंतर यावल नगर परिषदेचे सदस्यांची संख्या २३ राहणार आहे.

गेल्या पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूक तुलनेत यावेळीची नगरसेवक संख्या ३ ने वाढली आहे. यामध्ये अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती’ राखिव मधुन प्रत्येकी एक – एक महिला आरक्षणासह दोन – दोन जागा तर खुल्या प्रवर्गातील १० महिला आरक्षण १९ जागा खुल्या प्रवर्गात राहतील अशा एकूण २३ नगरसेवक सदस्य संख्या राहणार आहे.प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवण्याची शिवटची मुद्दत ही १७ मार्च पर्यंत करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like