जळगावत इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेची नूतन कार्यकारीणी जाहीर
खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ |जळगावत इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमए शाखेची नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. या करिता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे डॉ. सी. जी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी वर्षभरातील कामकाजाचा आराखडा मांडला. डॉ. सी जी चौधरी, डॉ. आठवले, डॉ. अनिल पाटील, डॉ. सिकची, डॉ. राजेश पाटील, डॉ. स्नेहल फेगडे आदींनी डॉ. चौधरी यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले.
आयएमए शाखेची नूतन कार्यकारीणीत नवीन पदाधिकार्यांचा ३ एप्रिल रोजी पदग्रहण सोहळा होणार आहे. बैठकीचे सुत्रसंचालन खजिनदार डॉ. भरत बोरोले यांनी केले.या बैठकीत आयएमएच्या जळगाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात अध्यक्षपदी डॉ. दीपक आठवले, उपाध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, सचिवपदी डॉ. जितेंद्र कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली.
खजिनदार डॉ. पंकज पाटील, सहसचिव डॉ. सुशिलकुमार राणे, डॉ. धीरज चौधरी, पीआरओ डॉ. विनोद जैन, सदस्य डॉ. राहुल मयुर, डॉ. पंकज शाह, डॉ. दीपक पाटील, डॉ. सारीका पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. अनघा चोपडे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम