‘परीक्षा पर चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधाना करणार मार्गदर्शन
खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तणावमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ ही जन-चळवळ बनविण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी करणार मार्गदर्शन.
त्यानुसार ‘परीक्षा पे चर्चा’ या पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती १ एप्रिल २०२२ ला होणार आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी दिली. यावर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर सकाळी ११ पासून टाउन-हॉल इंटरॲक्टिव्ह स्वरूपात होणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळं गेल्या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं झाला होता. यामध्ये देश-विदेशातील कोट्यवधी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. हा बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रम आहे. पंतप्रधान त्यांच्या अनोख्या आकर्षक शैलीत विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण आणि संबंधित क्षेत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतात. नरेंद्र मोदी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ताणवरहीत परीक्षांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
राज्याच्या राज्यपालांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातील निवडक विद्यार्थी राजभवनात उपस्थित असणार आहे. देशभरातील राज्य सरकारेही विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागाला प्रोत्साहन देतील. तरुणांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा भाग आहे. MyGov वरील स्पर्धांद्वारे निवडलेल्या स्पर्धकांना पंतप्रधानांकडून प्रशस्तिपत्रे आणि एक्झाम वॉरियर्स या पुस्तकासह विशेष ‘परीक्षा पे चर्चा’ किट प्रदान केले जाईल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम