राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यातील वैर सगळ्यांनाच माहिती आहे. भाजप सोडल्यापासून एकनाथ खडसे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार करत आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब असे विधान केले होते. वक्तव्याचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी समाचार घेतला आहे. आता पुन्हा एकदा खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे.

हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले. हिंदुत्व ज्यांच्याकडून शिकलो त्यांना जनाब संबोधणं चुकीचं असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.खूप प्रयत्न करून देखील सत्ता मिळत नसल्याने फडणवीस यांना फ्रस्टेशन आले. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मान्य नसावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी बाळासाहेबांबद्दल आदराची भाषा वापरली आहे, पण फडणवीस यांच्याकडून वारंवार वक्तव्य जे होत आहेत ते नैराश्यातून होत आहेत, असेही खडसे यांनी म्हटले आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मात्र अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचे आहे अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like