15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार
खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | जामनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन. या प्रकरणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावात जामनेर तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. याच गावातील एका तरुणाने तिला घरातून फूस लावुन पांढऱ्या चारचाकी गाडीत नेले. थोडा अंतरावर एका गावाजवळील रस्त्यावर थांबून गाडीतच तिच्यावर अत्याचार केला. मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यासंदर्भात पिडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम