जामनेर येथे उद्या राष्ट्रवादीतर्फे जिल्हास्तरीय मेळावा
खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्यातर्फे जामनेर येथे भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या जाती-जमाती विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्यासह जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड बंगाली सिंहा चीतोडिया राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
दिनांक 17 नोव्हेंबर गुरुवार रोजी जामनेर शहरातील मार्केट कमिटी मध्ये जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल विभागातर्फे भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यामध्ये भटक्या मुक्त जाती-जमातींना येणाऱ्या विविध समस्या बाबत चर्चा विचारविनिमय होणार आहे त्याचबरोबर विविध समस्यांचे निराकरण होण्यासाठी समन्वय साधला जाणार असून सदर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समस्या शासन स्तरावर पोहोचवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने या जिल्हा मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आले आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम