जळगावात तरुणीचा मोबाईल लांबवून दुचाकीवरील चोरटे पसार
खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | एका तरुणीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना ओरीयन इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षदा मुकेश कुलकर्णी (रा. एसएमआयटी कॉलेजजवळ) ही विद्यार्थिनी ,मंगळवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास मूळजी जेठा महाविद्यालयातील लेक्चर संपवून पायी घरी निघाली होती. ओरिअन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ स्कार्फ बांधण्यासाठी अक्षदा ही थांबली असता मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तिच्या खिशातील मोबाईल हिसकावला. अक्षदाने आरडा-ओरड केली. परंतू तो पर्यंत चोरटे मोबाईल घेऊन पसार झाले होते. घरी आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम