पत्नीला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या कारणावरून पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करण्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता शांताराम वाघ रा. लोहारखेडा ता. मुक्ताईनगर ह्या पती शांताराम वाघ यांच्या सोबत१३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने पेट्रोल घेऊन या असे सांगितल्याचा राग आल्याने पती शांताराम फकिरा वाघ याने पत्नी अनिता वाघ यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून डाव्या हाताला गंभीर दुखापत केली. अनिता वाघ यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला पतीविरोधात तक्रार दिली आहे. शांताराम वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून पोहेकॉ संतोष चौधरी तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like