नाशिक विभागीय मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षाची तयारी सुरू
खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | जळगाव दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना या परीक्षांवर शिक्षण विभागाच्या सात भरारी पथकांची करडी नजर असणार आहे. भरारी पथक प्रमुखांची नुकतीच बैठक पार पडली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च/एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा ४ मार्चपासून होणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदा बारावीच्या परीक्षेला ४८ हजार ५४४ परीक्षार्थी आहेत. येत्या ४ मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी ३५५ परीक्षा केंद्र असून सात भरारी पथके कारवाईसाठी तैनात करण्यात आली आहेत.
तर विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या दडपणामुळे निर्माण होणार तणाव दूर करून परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.आवश्यक सोयी-सुविधा व प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाकडून तयारी सुरू आहे.
परीक्षार्थींना कोणत्याही परिस्थितीत विनाकारण त्रास होणार नाही. परीक्षेत व्यत्यय येणार नाही तसेच वेळ वाया जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांना भेटी देत गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा व त्याचप्रमाणे परीक्षा सुरळीत पार पडतील या दृष्टीने प्रयत्नशिल राहावे. भरारी पथकप्रमुख व त्यातील सदस्यांनी सर्व काळजी घ्यावयाची आहे, अशा सूचना नाशिक विभागीय मंडळाकडून करण्यात आलेल्या आहेत.
यावर्षी नाशिक विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा ४५० केंद्रांवर , तर बारावीची परीक्षा २५० केंद्रांवर घेण्याची तयारी करण्यात येत आहे. मात्र, राज्य शिक्षणमंत्र्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा तेथे केंद्र’ या पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी अंतिम भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकातील सदस्य प्रत्येक परीक्षेसाठी बदललेले जाणार आहे. असेही विभागीय मंडळाकडून सूचना करण्यात आल्या आहेत
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम