जळगाव जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले १९ भारतात सुखरूप परतले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | रशिया-युक्रेन युद्धाला आठवडा उलटला असून हजारो भारतीय विद्यार्थी अद्यापही युक्रेनला अडकून आहेत.युद्धग्रस्त ईशान्य युक्रेनच्या खार्किव शहरात मंगळवारी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय नागरिकांनी संकटग्रस्त युक्रेनमधून लवकरात लवकर बाहेर पडावे, असा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनी तात्काळ युक्रेन सोडावे, असं आठवडाभरापूर्वी अॅडव्हायझरीत म्हटलं होतं. जळगाव जिल्ह्यातील १९ विद्यार्थी युक्रेनला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील १९ विद्यार्थी युक्रेनला असल्याची जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.१९ पैकी ५ विद्यार्थी भारतात परतले असून ६ सीमेलगत आहेत तर ६ सुरक्षित मार्गावर आहेत. तर दोन विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळत आहे.

विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अतिरिक्त उड्डाणेही चालवण्यात आली आहेत. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रत्येकजण प्रयत्न आहे.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निकीत आमले, शोएब राशीद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, बरीरा युसूफ पटेल हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आपल्या स्वगृही देखील पोहचले आहेत.

युद्धाला आठ दिवस उलटले असून हजारो भारतीय विद्यार्थी अद्यापही युक्रेनला अडकून आहेत. सौरभ विजय पाटील, ओम मनोज कोल्हे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रद्धा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितिजा गजानन सोनवणे हे विद्यार्थी पोलंड सीमेलगत आणि हंगेरीजवळ आहेत. तसेच विजय दिलीप परदेशी, प्रसन्ना संजीव निकम, कल्याणी छगनराव पाटील, रोहन सुनील चव्हाण, यश राजेंद्र परदेशी, शिमा फतेमा शेख अन्सार हे विद्यार्थी सुरक्षित आहे. यश हा होस्टेलच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.

जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद लागत असून कोणताच संपर्क होत नाही.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like