नंदुरबार जिल्हा गाईड कँप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ ।  नंदुरबार -महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य कार्यालय, मुंबई आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) नंदुरबार,यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने दिनांक ०४ एप्रिल २०२२ ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल नंदुरबार येथे गाईड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकूण ४५ शिक्षिका सहभागी झाल्या.नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच माध्यमिक शाळांमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षात स्काऊट गाईड अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढीकरता सदर प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले.

 

या प्रशिक्षण शिबिरास शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त माननीय श्री. एस.एस.चौधरी, नगराध्यक्षा तथा जिल्हा आयुक्त गाईड माननीय सौ. रत्नाताई रघुवंशी, जिल्हा अध्यक्ष मा.श्री.यशवंत नाना पाटील,मुख्यालय आयुक्त श्री.पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी भेट देऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. स्काऊट गाईड हा विषय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असून सर्व शाळांमध्ये हा प्रभावीपणे राबविण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रशिक्षण शिबिरास शिबीर प्रमुख श्रीमती शमा शिकलगार, शिबीर सहाय्यक श्रीमती कविता वाघ (जिल्हा संघटन आयुक्त), श्रीमती छाया पाटील श्रीमती पुनम नेरकर, श्रीमती सुषमा फुलंब्रीकर,श्रीमती आशा पाडवी यांनी काम पहिले.या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वितेसाठी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सतीश मंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like