१९ एप्रिल पासून भुसावळात कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ । भुसावळ परिसरातून अनेक नामवंत कबड्डी खेळाडू तयार करणे तसेच या खेळाची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशन मान्यतेखाली महाबली क्रीडा प्रसारक मंडळाच्या सहकार्याने श्री रामराज्य फाऊंडेशन, भुसावळ तर्फे दिनांक १९ एप्रिल व २० एप्रिल २०२२ रोजी पालिका शाळा क्रमांक २९, जळगांव रोडच्या पटांगणावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दिवस रात्र खेळवण्यात येणाऱ्या ७० किलो वजनी गटातील या स्पर्धेत २४ संघाचा समावेश असून आधी साखळी सामने नंतर बाद फेरीचे सामने होतील. मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेचे पहिले बक्षीस ११,०००/- व ट्रॉफी, व्दितीय बक्षीस ७,०००/- व ट्रॉफी, तृतीय बक्षीस ५,०००/- व ट्रॉफी असे आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी ५००/- आहे. महाबली क्रीडा मंडळ, श्रीरामराज्य फाऊंडेशन, श्री नगर गणेश व नवदुर्गा मंडळ, सप्तश्रृंगी पदयात्रा ग्रुप, भोई नगर मित्र मंडळ, श्रीनगर परिसरातील तरुण कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like