बालगोपालांसाठी “धम्माल नगरी” या कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ । विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर ,जळगाव येथील पूर्व प्राथमिक विभागात दिनांक ११- ०४- २०२२ सोमवार ते दिनांक १६ -०४- २०२२ शनिवार पर्यंत बालगोपालांसाठी “धम्माल नगरी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाची सुरुवात मा.मु.श्री.हेमराज पाटील सर, कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. किशोर पाठक सर ,समन्वयक श्री. उमेश इंगळे सर, नृत्यांगना महिला पालक सौ. अनुराधा झिंजुर्डे ,चिमुकल्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन , गुढीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

धम्माल नगरी म्हणजे निखळ आनंद,उत्साह, स्वच्छंदी राहणे. पण ह्या आनंदातुनही आपण हसत खेळत काहितरी नविन शिकले पाहिजे . हे शिकत असतांना नकळत शिस्त, सहकार्य, नविन मित्र मैत्रिणी यांच्याशीही जुळवून घेता यावे हे मूल्य बालकांना रुजवण्याचा प्रयत्न . त्यासाठी विविध प्रकारच्या हसत खेळत ,सहज आनंद देणाऱ्या कृतींचा यात समावेश करण्यात आला आहे.

धम्माल नगरीत विविध प्रकारच्या गोष्टीतून धम्माल करून विविध प्रकारचे अनुभव देऊन मुलांमध्ये असणाऱ्या चौकस जिज्ञासू वृत्तीचा विचार करून त्यांना त्यामागिल विज्ञान समजावून सांगणे . आजीने सांगितलेली गोष्ट नकळत सकारात्मकता देणारी असते . विद्यार्थ्यांनीआनंदाने नविन जीवन उपयोगी मूल्य अंगिकारावी जोपासावी. हा मुख्य हेतू लक्षात घेऊन या धम्माल नगरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नृत्यातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन देखील करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री . हेमराज पाटील सर , समन्वयिका सौ .जयश्री वंडोळे दिदी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like