गतिमंद मुलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या गतिमंद तरुणीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती गतिमंद असल्यामुळे घरीच एकटी असते. ५ डिसेंबर रोजी गतिमंद मुलगी ही घरी असताना गावातील संशयित आरोपी प्रताप भीमसिंह ठाकरे (वय-३१) याने तिच्यावर गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला होता. या संदर्भात तरुणीने दिलेल्या हातवारे इशाराच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत संशयित आरोपी प्रताप भीमसिंह ठाकरे (वय-३१) याला ९ डिसेंबर रोजी अटक केली. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक एस.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, मिलिंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश मांडोळे, अमोल पाटील, गणेश नेटके, महेश बागुल, राजेंद्र निकम, निलेश लोहार, शैलेश माळी, कमलेश राजपूत, प्रताप मथुरे, गोरख चकोर दीपक महाजन, योगेश बोडके, हनुमंत वाकचौरे यांच्यासह यांनी परिश्रम घेवून संशयित आरोपीला अटक केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like