रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ Iधावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ११ डिसेंबर रोजी पहाटे उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रविवारी ११ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ नरेंद्र नलवाडे, नरेंद्र शिंदे, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मयतची ओळख पटली नसुन रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ज्ञानेश्वर पाटील हे घेत आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक एस.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, मिलिंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश मांडोळे, अमोल पाटील, गणेश नेटके, महेश बागुल, राजेंद्र निकम, निलेश लोहार, शैलेश माळी, कमलेश राजपूत, प्रताप मथुरे, गोरख चकोर दीपक महाजन, योगेश बोडके, हनुमंत वाकचौरे यांच्यासह यांनी परिश्रम घेवून संशयित आरोपीला अटक केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like