महावितरण बिलांची थकबाकी रुग्णालयांचा वीजपुरवठा करणार खंडित
खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | खानदेशात कोरोना काळात रुग्णालयात कोणत्याही प्रकारची अडचण न आणता वेळोवेळी वीजपुरवठा सुरळीत चालू होता. शासकीय व खासगी रुग्णालयाने अद्यापही वीज पुरवठा चे पैसे भरलेल्या नाहीत त्यामुळे महावितरणने वारंवार सांगूनही दुर्लक्ष केल्याने रुग्णालयांच्या वीज खंडित करण्यात आले आहे.
महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. खानदेशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. कोविड संकटात महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित केला नाही यासाठी अती दक्षता घेतली आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीज जोडण्यांची १ कोटी ८४ लाख ६४ हजार २४४ रुपये थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ६९ हजार ११३ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. आता नाइलाजास्तव या रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम