अजित पवारांनी मांडले अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत याच्या कडून महाविकास आघाडी सरकारचा राज्य अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साहायाने अर्थसंकल्प सादर केला आहे.

या अर्थसंकल्पामधून राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद सरकारने केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले.

पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, नियमितपणे कर्जफेक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

आता २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली, असे अजित पवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like