आजचे राशिभविष्य , पहा कसा आहे शनिवारचा दिवस.

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.दैव आज तुमच्याच बाजूने आहे. वाणीत गोडवा असूद्या.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.काहींचा अध्यात्माकडे कल राहील.व्यावसायिकांना जाहिराती वर भर द्यावा लागेल. आर्थिक क्षमता वाढेल.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.उधारी उसनवारी आज नको.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.जुन्या गुंतवणुकीतून पुरेसा लाभ होईल.
कन्या : व्यवसायात चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.नास्तिक ही देवाला एखादा नवस बोलतील.
वृश्चिक : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. धनलाभाची शक्यता.फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.
धनु : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.
कुंभ : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात वाढ होईल.आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील
मीन : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. नवीन हितसंबंध होतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम