पाणीची वेळ न बदल्यान नागरिकांसह मनसे पदाधिकारी नगरपालिकेत दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | जळगाव शहरातील यावल येथे सार्वजनिक पाणी पुरवठाची वेळ रात्रीची असून वेळेत बदल करण्याचा मागण्या आहे. या मागणीसाठी येथील नागरिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १२ वाजता नगरपालिकेत हजेरी दिली.

नागरिकांच्या पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी नगरपालिकेची असते. जळगाव शहरातील यावल येथे सार्वजनिक पाणी पुरवठाची वेळ रात्री ३ वाजता आहे. नागरिकांना या झोपेच्या वेळेस रोज पाण्यात करता जागे रहावे लागते. पालिकेला पाण्याची वेळ बदलण्यासाठी मनसेने यापूर्वी देखील निवेदन दिले होते. परंतु त्यावर तोडगा न निघाल्यामुळे संतप्त नागरिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे, अभियंता एस.ए.शेख यांना जाब विचारण्यासाठी नगरपालिकेत १२ वाजेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेठीस धरले. नागरिकांनी अधिकारी कर्मचार्‍यांना वेठीस धरले होते.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेने उत्तर द्यावे अन्यथा नागरीक न्यायालयात धाव घेतील असा इशारा देण्यात आला आहे. गरपालिकेत आंदोलक महिला व नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष आकाश चोपडे, तालुका उपाध्यक्ष गणेश येवले, शहर उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, विद्यार्थी सेनाध्यक्ष विपुल येवले, काऊ घारू, गणेश येवले, तुषार गजरे, कुणाल गजरे, भावेश तायडे, सावंत जाधव, जयेश सुरवाडे, महेश घारू, जतीन घारू आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like