प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन
खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी झटपट कामे करत आहेत. निवडणूक जवळ आल्यामुळे विकासकामांना वेग चांगला वेग मिळत आहे. जळगाव येथील रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मलकापुर तालुक्यातील वाकोडी, खोपोडी, लोणवाडी राज्य मा.२७० या मंजूर रस्त्यांचे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार राजेश येकडे, अर्चना काजळे, रमेशसिंग गौर, भावराव काजळे, मुकुंदा जवकार, राहुल तायडे, रामा काकर, धनराज काजळे, नरेश तायडे, बाबुराव बावस्कर, पुरुषोत्तम जाधव, नवल सोळंखे, गणेश पाटील, वैभव काजळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून, अनेक कामांना चालना मिळाली आहे. ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन विकासाला गती मिळेल असं चित्र दिसत आहे. तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नांदुरा तालुक्यातील राज्य महामार्ग २७७ बुर्टी,काटी रस्ता दर्जोन्नत करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी ३.७२ कोटी निधी मजूर करण्यात आला आहे. यामुळे बुर्टी व काटी ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे.
प्रसंगी आमदार राजेश एकडे, माजी जि.प.सदस्य विलास पाटील, नितीन देशमुख, संतोष दिघे, अजमत मिर्झा, रवींद्र सातव, अब्दुल बसित, अब्दुल मोहसीनोद्दीन, संदिप पाटील, माणिकराव ठाकरे, निंबाजी ठाकरे, ॠषिकेश देशमुख, संतोष दांडगे यांच्यासह कार्यकर्त्ये व ग्रामस्थ उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम