पतीच्या मृत्यूनंतर सासू, सासरे आणि चुलत दीराने मिळून केला महिलेवर अत्याचार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. पतीच्या मृत्यूनंतर सासू, सासरे आणि चुलत दीर यांनी एका पीडित महिलेची फसवणुक करत नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेच्या पतीचा २०२० मध्ये कोरोनाने मृत्यू झाला. पीडित महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. पतीच्या मृत्यूनंतर सासू, सासरे आणि चुलत दीर यांनी पीडित महिलेला लग्नाचे खोटे अमिष दाखवत तिला माहेरी जाण्यास नकार दिला. तसेच वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवुन चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला.

पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर पतीच्या निधनानंतर मिळणारी रक्कम बँकेत मिळणार होती. ही माहिती पीडित महिलेच्या दिरास कळली. वेगवेगळे बहाने करुन महिलेच्या पतीच्या खात्यातील रक्कम ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये वळती करुन घेतले. एवढेच नाहीतर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले.

याप्रकरणी संशयीत सासू, सासरे आणि चुलत दीर यांच्या विरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like