शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा केली निश्चित

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय किती असावं हा काही गेल्या वर्षांपासून सुरु असलेला घोळ अखेर मिटला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. वयोमर्यादेवरून शिक्षण विभागात अनेक तक्रारी येतात यासाठी हे परिपत्रक जाहीर केले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यात कमाल वयोमर्यादेनुसार नर्सरी प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ डिसेंबर २०२२पर्यंत चार वर्ष पाच महिने ३० दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. यापूर्वी कमाल वयाची मर्यादा ठरवण्यासाठी जून महिना मानक म्हणून मानला जात होता. मात्र, जुलै ते डिसेंबर महिन्यात जन्माला आलेल्या मुलांना एक वर्ष उशिराने प्रवेश मिळायचा.प्राथमिक शिक्षण विभागाकडून नर्सरी (प्ले ग्रुप), ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि पहिली अशा चार इयत्तांसाठी ही वयाची कमाल मर्यादा घालण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्ले ग्रुप, नर्सरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने ३० दिवस इतके निश्चित करण्यात आले आहे. ज्युनिअर केजीसाठी हे वय पाच वर्षे पाच महिने ३० दिवस, तर सीनियर केजीसाठी सहा वर्षे पाच महिने ३० दिवस आणि पहिलीसाठी सात वर्षे पाच महिने ३० दिवस इतके निश्चित करण्यात आले आहे.

या वयापेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गांमध्ये प्रवेश न देता पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. वयोमर्यादेनुसार परिपत्रक जाहीर केले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like