मार्च महिन्यातच उन्हाळ्यी तापमानात होणार वाढ
खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | मार्च ते मे या कालावधीत राज्यात उन्हाळा असतो. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसतेय. मार्च महिण्याच्या पहिल्याच दिवशी १ मार्च जळगावातील किमान तापमानात 4 अंशांची वाढ झाली.
त्यामुळे जिल्ह्यातील कमाल तापमान ३६ अंशांवर कायम आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही वाढला.
साेमवारी १४ अंशांवर असलेले किमान तापमान मंगळवारी १८.२ अंशांवर गेले हाेते. विदर्भ आणि मराठवाडा येथे तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे. कमाल आणि किमान तापमानात या महिन्यात वाढ हाेणार आहे. किमान तापमान १८ अंशांपुढे गेल्याने आता रात्रीचा गारठाही कमी हाेईल. आठवड्यात किमान तापमान ३६ अंशांवरून ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात शनिवार-रविवार सर्वाधिक उष्ण असतील.
या दाेन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ८ मार्चपर्यंत उन्हाच्या झळा अधिक असतील. १० मार्चनंतर कमाल तापमानात काहीशी घट हाेण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात तापमान ३५ ते ३६ अंशांवर स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.यानुसार कोकण, घाट प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम