विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा

०२ मे २०२२ । खान्देश लाईव्ह । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना ८ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आले होते.

युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश परिपत्रक क्रमांक २६/२०२२ द्वारे प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.

मा. शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. मात्र विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नव्हते. विद्यापीठातील सर्व अधि विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत. विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे. अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती.

यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीष सपकाळे, भुषण सोनवणे, अमोल मोरे, प्रितम शिंदे, विद्यापीठ युवाधिकारी अनिकेत पाटील, ॲङ अभिजीत रंधे, यश सोनवणे, मयूर रंधे, सागर पाटील, ध्रृवा पाटील, पुष्पक सुर्यवंशी आदि युवासैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like