रामदास कॉलनीतील श्री ओंकारेश्वर महादेव निमित्त महाशिवरात्री महोत्सव आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | जळगाव शहरातील रामदास कॉलनीतील श्री ओंकारेश्वर महादेव मंदीरात मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्ताने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आले होते. ठिकाणी महाशिवरात्र, श्रीराम नवमी, श्रीकृष्णा जन्माष्टमी असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

जळगाव येथे रामदास कॉलनी येथील श्री ओंकारेश्वर मंदीरात भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्थान आहे. या शहरात १ मार्च मंगळवारी रोजी महाशिवरात्री निमित्त भाविकांनी स्वयंभू शिवपिंडाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रामदास कॉलनी येथील श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या श्री ओंकारेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवसातून बांधण्यात आलेले हे मंदिर आहे.

नवस पूर्ण करण्यासाठी या मंदीरात स्वयंभू शिवपिंड स्थापन करण्यात आली आहे. या मंगळवार १ मार्च रोजी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत संस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती विश्वस्त जुगल जोशी यांनी दिली.सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्या कमी असल्याने महाशिवरात्री महोत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यास परवानगी आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like