खान्देश रत्न सोहळा पुरस्कार 2022 उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | 26 फेब्रुवारी रोजी जळगांव सप्तरंग इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट तर्फे खान्देश रत्न सोहळा पुरस्कार 2022 उत्साहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम हॉटेल फोर सिझन येथे उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमला मुख्य आकर्षण म्हणून मराठी सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची विशेष उपस्थित होती.

या कार्यक्रमात मान्यवर जळगाव डिस्टिक लॉयर्स कंज्यूमर कॉपरेटिव सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय राणे, अ‍ॅड. राजेश झाल्टे, माधवबाग हॉस्पिटलच्या डॉ. श्रद्धा अमित माळी, पातोंडेकर ज्वेलर्सचे किरण पातोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात खांदेशात विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करून खान्देशाचे नाव उंचावलेल्यांना खान्देश रत्न पुरस्कार देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम चे सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले तर प्रास्ताविक अमित माळी यांनी मांडले. कार्यक्रमाचे आयोजन सप्तरंग इव्हेंट अँड मॅनेजमेंट चे संचालक आशुतोष पंड्या, पार्थ ठाकर, पंकज कासार, पवन कासार, नेहा शिंदे, प्रथमेश कासार यांनी केले.

डॉ. संदीप जोशी ( आरोग्यसेवा ), डॉ. चंद्रकांत बारेला(आरोग्यसेवा), दिपाली देशमुख (योग व प्राणायाम) प्रतापराव पाटील(शासकीय व सामाजिक), सुरज नारखेडे (राजकीय व सामाजिक), सुनील चौधरी (सामाजिक व राजकीय), विपिन बोरोले(शिक्षण), नितीन थोरात (फोटोग्राफी), अंजली निलेश तिवारी(ब्युटीशियन), विजय नन्नवरे(सहकार क्षेत्र), मुकुंद गोसावी(सामाजिक), राहुल सूर्यवंशी(सामाजिक) टेनु बोरोले(शेती).

भागवत महाजन( शेती), धीरज महाजन(उद्योजक), डॉ. अजित नांदेडकर(उद्योजक व सामाजिक), श्रीराम पाटील(उद्योजक व सामाजिक), राहुल पाटील(उद्योजक) डॉ. तेजांश कडू(उद्योजक), हिमांशू इंगळे(उद्योजक), विनोद पाटील(उद्योजक व सामाजिक), मीता बनवट(उद्योजिका), दीपमाला काळे (राजकीय व सामाजिक), डॉ. नितीन चौधरी(आरोग्यसेवा), डॉ. प्रविण पाचपांडे(आरोग्यसेवा) यांना खान्देश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like