अमूल दुधात 2 रुपयांची वाढ, ग्राहकांनच्या खिशाला लागली कात्री

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | महागाई दिवसेंदिवस वाढतच असून त्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक वाईट बातमी आहे. आजपासून अमूलचे दूध महागणार आहे. देशातील नामांकित दुध आणि दुग्धजन्य पदार्थांशी संबंधीत असलेली कंपनी अमूलने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वाधिक प्रसिद्ध असलेल अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्याच प्रमाणे देशात इतर कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यात सक्रीय आहेत. त्या कंपन्या देखील आता त्यांच्या दूधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ अमूलकडून सर्व प्रकारच्या दुधावर केली जाणार आहे.

अमूलच्या सोने, ताजा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीचे दूध यावर हि वाढ असेल. या दरवाढीनंतर अमूल गोल्ड दुधाची किंमत ३० रुपये प्रति ५०० मिली होईल. अमूल ताझा २४ रुपये प्रति ५०० ​​मिली आणि अमूल शक्ती २७ रुपये प्रति ५०० ​​मिली दराने विक्री केले जाईल.अमूल ने यांचे कारण पॅकेजिंग, वाहतुकीचा खर्च आणि जनावरांचा चाऱ्याचा खर्च वाढला आहे. अमूल एक दूध सहकारी संस्था आहे. ज्यांची सुरूवात गुजरातमधून झाली.

दरवाढीचा फायदा दूध उत्पादकांना होणार आहे कारण ग्राहकांनी दुधासाठी भरलेल्या प्रत्येक रूपयापैकी सुमारे ८० पैसे दूध उत्पादकांना देण्याचे कंपनीचे धोरण आहे. अमूलने जवळपास ७ महिने आणि २७ दिवसांच्या अंतरानंतर दुधाच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी वाढले होते. आजच्या सुरुवातीला, अमूलने आपल्या ग्राहकांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like