आनोरा येथे शेतकऱ्यांचे पशुधन चोरी

खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील आनोरा येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून पशूधनाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी प्रमोद भिमराव पाटील (वय-४०) रा. गारखेडा ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे धरणगाव तालुक्यातील आनोरा शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात ते गाय, गोऱ्हा व इतर पशूधन बांधलेले असतात. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या शेतात बांधलेले गाय, गोऱ्हा आणि वगार हे बांधलेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रूपये किंमतीचे पशूधन चोरून नेल्याचे बुधवारी २१ डिसेंबर रेाजी सकाळी उघडकीला आले. त्यांची सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंदूलाल सोनवणे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम