महामार्गावर डंपरची दुचाकीला धडक ; एक जण जखमी
खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I जळगाव शहरातील शिवकॉलनी ते मानराजपार्क परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार वृध्द जखमी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातप्रकरणी गुरुवार, २२ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील निवृत्तीनगरात साहबराव कौतिक सैंदाणे वय ६५ हे वास्तव्यास आहेत. ते २१ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीने संध्याकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास शिवकॉलनीकडून मानराजपार्क परिसरातून जाणाऱ्या महामार्गावरुन जात होते, यादरम्यान रेल्वे पूलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. यात दुचाकीवरुन खाली पडल्याने साहेबराव सैंदाणे यांना दुखापत झाली आहे. तर दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पसार झाला. याप्रकरणी साहेबराव सैंदाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवार, २२ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम