जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई गोंडू महाजन अपात्र
खान्देश लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I येथील जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई गोंडू महाजन संचालक पदावरून अपात्र झाल्याने, रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जनाबाई महाजन यांनी जिल्हा बँकेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पॅनल तर्फे माजी आमदार अरुण पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्यांनी अचानक माघार घेत अरुण पाटील यांना पाठिंबा दिल्याने, खडसे गटाला धक्का बसला होता, मात्र जाहीर माघार घेऊनही त्यांनी निवडणूक जिंकल्याने, अरुण पाटील यांच्यासाठी एकतर्फी असलेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या नंतर जनाबाई महाजन यांनी निवडणूक झाल्यावर ६० दिवसात खर्च सादर केला नाही म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. याबाबत आदेश नाशिक सह निबंधक विलास गावडे यांनी दिला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम