१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी २२ डिसेंबर रोजी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान तिची ओळख गावातील अक्षय उर्फ आकाश जितेंद्र जाधव (वय-२१) याच्यासोबत झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये अक्षय जाधव याने अल्पवयीन मुलीवर त्याच्या शेतात अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने पीडित मुलीसह पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी अक्षय उर्फ आकाश जितेंद्र जाधव (वय-२१) याच्या विरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like