मयत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला
खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील बहुळा धरणात गेल्या दोन दिवसांपुर्वी एक वृद्ध महिला पडल्याची माहिती समोर आली होती. सलग दोन दिवस शोध कार्य सुरु असतांना आज सदर पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडला असुन मयत वृद्ध महिला ही तालुक्यातील बिल्दी या गावातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाचोरा तालुक्यातील बिल्दी गावानजीक असलेल्या बहुळा मध्यम प्रकल्पात एक वृद्ध महिला पडल्याची घटना दि. २० डिसेंबर रोजी घडली होती. दरम्यान त्याच दिवसापासून महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तब्बल ४८ तासांनंतर महिलेचा मृतदेह आज २२ डिसेंबर रोजी सापडला असुन रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. सदर महिलेचे नाव शांताबाई शंकर सोनवणे (वय – ७०) रा. बिल्दी ता. पाचोरा असे असुन वृद्ध महिला ही अनेक दिवसांपासून शारिरीक व्याधीने त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. मयत शांताबाई सोनवणे यांचे पाश्चात्य तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम