बसमधून २ लाखांचे दागिने लांबवीले; चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I धुळे ते पारोळा बसमधून २ लाख ८ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. ३ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदा जग्गनाथ सोनटक्के (वय ३३, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ, जळगाव) हे दि. ३ डिसेंबर रोजी धुळे ते [पारोळा (बस क्र. एम.एच १४, बीटी ०७३७) ने आपल्या परिवारासह प्रवास करत होते. पारोळा येथे घरी पोहचल्यावर खाकी रंगाची बॅगेला लावलेले कुलुप पाहता तिचे चैनचे रनर तुटलेले होते. बॅग उघडून बघितले असता त्यातील 2 लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने नव्हते. त्यामुळे आनंदा सोनटक्के यांची खात्री झाली की, त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असलेले चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेवर बॅग ठेऊन त्यांच्या बँगेमध्ये ठेवलेले दागीने चोरी केले आहेत. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ. योगेश जाधवा हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like