चहार्डी ग्रामसेवकाची पकडली कॉलर ; महिलेविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील चहार्डी येथे ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरु असताना एका महिलेने रोजदारीच्या कामावरुन कमी केल्याच्या कारणावरून ग्रामविकास अधिकारी यांची कॉलर पकडली तसेच त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी चोपड़ा शहर पोलिसांत गुन्हा ‘दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चहार्डी येथे ३ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. या वेळी कोमलबाई बापूराव पाटील यांनी मासिक सभेत येवून ग्रामविकास अधिकारी एस. आर. पारधी यांना रोजंदारी कामावरुन कमी केले व वृत्तपत्रात नाव आल्याने बदनामी झाली, या कारणावरून वाद घातला. तसेच ग्रामविकास अधिकारी पारधी यांच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोमलबाई पाटील यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक घनश्याम तांबे करत आहेत. दरम्यान, कोमलबाई पाटील यांनी ग्रामपंचायतीत काम करताना परवानगी न घेता नमुना नं.८मध्ये नोंद केल्याने त्यांना एका सभेत रोजंदारी कामावरुन कमी करण्यात आले होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like