स्टिंग ऑपरेशन मधील जळगाव कनेक्शन उघड, प्रवीण चव्हाण यांचा खुलासा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलत असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकार विरोधकांवर टीका करत विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र सरकार रचत असून या कामात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हाताशी धरले आहे असा गंभीर आरोप केला आहे.

तसेच फडणवीस यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेन ड्राईव्ह देखील दिला आहे. यामध्ये सरकारच्या षड्यंत्राची पुरावे असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. मात्र विधानसभेत फडणवीस यांनी केलेले आरोप आता प्रवीण चव्हाण यांनी फेटाळून लावले आहेत तसेच या स्टिंग ऑपरेशन मागे जळगाव कनेक्शन असल्याचेही ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण चव्हाण म्हणाले की या व्हिडिओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे तसेच मूळचा जळगावचा असलेले तेजस मोरे नावाचा तरुण म्हणून आपल्याकडे आला आहे. यातून या स्टींग ऑपरेशनमध्ये जळगाव कनेक्शन उघड झाले आहे असेही ते यावेळी चव्हाण म्हणाले.

दरम्यान ते पुढे असे म्हणाले तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामीन मिळण्याकरिता माझ्याकडे येत होता तसेच त्याला अनेकांची साथ आहे मी चालवत असलेल्या केस मध्ये दारू पीत तुरुंगात आहे त्याची मला सात असे . तसेच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असे चव्हाण म्हणाले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like