जणू काही देवदूत! खिर्डी येथे पत्रकाराने वाचवले कबुतराचे प्राण!
खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | जळगाव येथील खिर्डी तालुक्यातील श्री कृष्ण मंदिर संस्थान परिसरात पतंगाचा दोरा धडकून खाली पडलेल्या कबूतर पक्षी अडकला होता. कबुतराला बऱ्याच जखमा झाल्या असून हे दृश्य पत्रकार सादिक पिंजारी यांना दिसले.
घरी धाव घेऊन सादिक पिंजारी पक्षाची पाहणी करण्यास गेले. पक्षाची पाहणी केली असता एका पंखावर पंचर मोठ्या जखमा आढळून आल्यामुळे त्यांनी तात्काळ गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून कबुतरांचे प्राण वाचवले. रावेर तालुक्यातील खर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान अकरा रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तो कबुतर पतंगाचा दोऱ्यामध्ये अडकून खाली पडला व त्याला गंभीर जखम झाली असून त्या कबुतराला जखमी अवस्थेत पक्षीमित्र पत्रकार याने त रीत धाव औषधोपचार केले.
पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्रथम उपचार पशु आरोग्य सेवक सुपडु तायडे यांनी केले असून दोन-तीन दिवस देखभाल करून त्याला पुन्हा मलमपट्टी करावी असे सांगण्यात आले त्या कबुतराला येथील श्री. कृष्णा मंदिर संस्थानात ठेवण्यात आले आहे. यादरम्यान पत्रकार सादिक पिंजारी प्रदीप महाजन पंजाबी, प्रवीण शेलोडे, भीमराव कोचुरे आदी उपस्थित होते
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम