जळगाव केंद्रातून इंदूर संस्थेचे ‘ डहूळ ‘ नाटक प्रथम!

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव येथील जळगाव केंद्रातून नाट्य भरती इंदूर या संस्थेतील ‘डहूळ’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.

तर, जळगाव या संस्थेच्या, मूळजी जेठा महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘ब्लडी पेजेस’ या नाटकास द्वितीय प्रथम पारितोषिक मिळाले. नाटकाचे अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तर बहुउद्देशीय संस्था जामखेड या संस्थेच्या ‘महापात्रा’ नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

डहूळ नाटकाचे दिग्दर्शन, प्रथम श्रीराम जोग यांनी केले तरतर ब्लडी पेजेस या द्वितीय नाटकाचे दिग्दर्शन वैभव मावळे यांनी केले. त्यातील प्रथम प्रकाश योजना पारितोषिक अभिजित कळमकर, तर द्वितीय ब्लडी पेजेस नाटक प्रकाश योजना पारितोषिक उमेश चव्हाण यांस मिळणे.

त्यात रंगभूषा प्रथम योगेश लांबोळे ( महापात्रा ) तर द्वितीय रंगभूषा पारितोषक प्रज्ञा बिऱ्हाडे ब्लडी पेजेस या नाटकास मिळाले. त्यात उत्कृषट अभिनय म्हणजेच रौप्यपदक पटकावले तो दीपक महाजन ब्लडी पेजेस व द्वितीय नेहा पवार( महापात्रा ) या दोघांना मिळाले.

सर्व पारितोषक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक कार्य बिभीषण चवरे तर जळगावचे राज्य नाटक समन्वयक दिपक पाटील यांनी अभिंनदन केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like