सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने आणि भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या नेत्यांना जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेची शपथ दिली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like