शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आहेत. सुषमा अंधारे यांचे मंगळवार दि. १ नोव्हेबर रोजी सकाळी ६ वा. जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. पुढील चार दिवसात जळगाव लोकसभेतील धरणगाव, पारोळा व पाचोरा तसेच रावेर लोकसभेतील चोपडा व मुक्ताईनगर येथे सभा घेणार आहेत.

या यात्रेदरम्यान मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता हॉटेल के.पी.प्राईड जळगाव येथे शिवसेना उपनेत्या- सुषमा अंधारे, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत व युवासेना विस्तारक शरद कोळी हे जळगाव जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या वेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, शिवसेना जिल्हासंघटक गजानन मालपुरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव जिल्हा विस्तारक चैतन्य बनसोडे, विस्तारक किशोर भोसले आदी मान्यवर उपस्थित राहतील. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना जिल्हा युवा अधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, चंद्रकांत शर्मा यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी जळगाव लोकसभा कॉलेज कक्ष युवा अधिकारी प्रितम शिंदे, महानगर युवाअधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, विधानसभा युवा अधिकारी अमित जगताप आदी परीश्रम घेत आहेत.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like