जळगावात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दुचाकी रॅलीसहविविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे जळगांव विभाग, सरदार वल्लभभाई पटेल बहुउददेशीय संस्था व अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, जळगांव यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमिताने काव्यरत्नावली चौक जळगांव येथून सकाळी ७.०० वाजता सर्वधर्मीय एकता रॅली आयोजित करण्यात आली होती.

सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या जिपवरून मिरवणूक काढण्यात आली. त्यात शेकडो दुचाकीस्वारसहभागी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नयन प्रकाश शास्त्रीजी, डॉ.उल्हास पाटील, आ.राजूमामा ओळे, जयश्रीताई महाजन, डॉ.ए.जी.भंगाळे, गुलाबराव देवकर, विष्णू भंगाळे, कैलास अप्पा सोनवणे, शरद तायडे, प्रतिभाताई शिंदे, डॉ.केतकीताई पाटील, भागवत भंगाळे, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.जितेंद्र कोल्हे, रवीद्र पाटील, सुनील फालक, प्रा.डॉ.राजेंद्र वाघुळदे, महेश पाटील, ललित भय्या चौधरी, लीला चौधरी, डॉ.प्रशांत वारके, मनोज काळे, कुंदन काळे, अमित काळे, डॉ.विरेन काळे,योगेश पाटील, रुपेश चौधरी, राकेश चौधरी, सुरेंद्र कोल्हे, सचिन धांडे उपस्थित होते.

रॅलीचा समारोप लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पजन माल्यार्पण करून करण्यात आला. पुजन त मालगापशा हर महेंद्र पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, दिपक दाभाडे इ.चे सहकार्य लाभले.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like