राज्यात उन्हाचे चटके तर दुसरीकडे वर्तवली जातेय अवकाळी पावसाचा शक्यता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | राज्यासह जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३६ अंशांपुढे गेला असून उन्हाचा चटका बसण्यस सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळते आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

मात्र अशातच ७ आणि ८ मार्च राेजी जिल्ह्यासह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही पावसाला पोषक हवामान होत असून ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. सोमवारपासून म्हणजेच दिनांक सात मार्चपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सातत्याने ३४ ते ३७ अंश यापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.

याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी (८ मार्च) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे. हंगामातील अन्य पीकांना या वादळी पावसाचा धाेका आहे. वाऱ्यामुळे मका पिकाचे नुकसान हाेण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like